थोर समाजवेसक बाबा आमटे यांचे पुत्र आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.प्रकाश आमटे यांच्यातर्फे गडचिरोली येथील त्यांच्या लोकोपयोगी केंद्रात माओवाद्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पण, आपण फक्त डॉक्टर म्हणून आपले काम केले आहे आणि या प्रक्रियेतून अतिशय टोकाची भूमिका घेणा-या व्यक्तींना मदत केल्याचा अथवा करण्याचा आपला मानस नाही, असे डॉ.प्रकाश आमटे यांनी स्पष्ट केले आहे.
शरण आलेल्या माओमाद्यांना नेहमी रोगाणुनाशन प्रक्रियेतून जाण्यासाठी जबरदस्ती केली जाते, पण उच्चपदी असलेल्या माओवाद्यांच्या नेत्यांनी या गोष्टीला नकार दिला आहे आणि हा पोलिसांनी केलेला प्रचार असल्याचे म्हटले आहे. तसेच, हा मानवी हक्काचा सर्वात मोठा भंग असल्याचे छत्तीसगढ पोलिसांनी म्हटले आहे.
पुन्हा वडिल होता यावे आणि सामान्य जीवन जगता यावे यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये तीन माओवाद्यांवर विरूध्द नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, याबाबत ‘द इंडियन एक्स्पेस’ने बातमी दिली होती. त्याच्यामते आमटेंतर्फे जवळपास ४० माओवाद्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती.
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पामध्ये सीपीआयच्या (माओवादी) सेंट्रल कमिटीमधील काही मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.
गडचिरोलीमधील माओवाद्यांवर प्रकाश आमटेंतर्फे माओवाद्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया
थोर समाजवेसक बाबा आमटे यांचे पुत्र आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.प्रकाश आमटे यांच्यातर्फे गडचिरोली येथील त्यांच्या लोकोपयोगी केंद्रात माओवाद्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पण, आपण फक्त डॉक्टर म्हणून आपले काम केले आहे आणि या प्रक्रियेतून अतिशय टोकाची भूमिका घेणा-या व्यक्तींना मदत केल्याचा अथवा करण्याचा आपला मानस नाही, असे ही डॉ.प्रकाश आमटे यांनी स्पष्ट केले आहे.
First published on: 03-12-2012 at 11:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash amte carried out vasectomies on maoists in gadchiroli