शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच ठाण्यात माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटलं. त्यावर संतापलेल्या देवेंद्र फडणवीसांनी “मी काडतूस आहे, झुकेगा नही, घुसेगा” अशा शब्दात उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं. ठाकरे आणि फडणवीसांमधली खडाजंगी एकीकडे सुरू असताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी या दोघांवरही टीकास्त्र सोडलं आहे. प्रकाश महाजन म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी, उद्या मी बोललो तर महागात पडेल असं काही बोलण्यापेक्षा खरंच काहीतरी बोलावं. महाराष्ट्राच्या जनतेला सर्वकाही कळू द्यावं”.

प्रकाश महाजन म्हणाले की, मला बरंच काही माहिती आहे, उद्या मी बोललो तर… असं काही फडणवीस यांनी बोलण्यापेक्षा खरंच काहीतरी बोलावं. आमचीदेखील इच्छा आहे तुम्ही बोलावं. जनतेला कळू द्या, त्यांनी तुम्हाला फडतूस म्हटलंय, तुम्ही बोला नेमकं काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला.

accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “…तर मविआचे कार्यकर्ते फडणवीस, अजित पवारांच्या बॅगा तपासतील”, निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

हे ही वाचा >> “…तेव्हा माझ्यावर दारुवाली बाई अशी टिप्पणी झालेली”, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, “राजकारणात…”

महाजन म्हणाले की, एक उडत उडत आलेली माहिती आहे. ही माहिती खरी आहे की खोटी याबद्दल माझ्या मनात शंका आहे किंवा त्याला भक्कम आधार नाही. परंतु मातोश्री २ बंगल्याचं जे बांधकाम सुरू आहे, त्याच्या एफएसआयवर काही प्रश्न होते. ते देवेंद्र फडणवीसांनी सोडवले होते. तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस तुमच्यासाठी फूल होते, ते आता तुमच्यासाठी फडतूस झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता सांगावं ते खरं होतं की खोटं होतं. ते तुम्हाला फडतूस म्हणतायत आणि तुम्ही जर खरंच काडतूस आहात तर मग एखादी गोळी चालवून दाखवा.