उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापुर तालुक्यातीला रामतीर्थ तांडा येथील प्रणिता मोहन पवार हीने २०१७ मध्ये श्रीलंका येथे झालेल्या कराटे स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूला हरवून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. वडील रिक्षा चालवून मुलीच्या शिक्षणाच्या खर्चासह कुटुंब चालवत होते, मात्र दीड वर्षांपूर्वी करोनामुळे त्यांचे निधन झालं आणि या कुटंबावर उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीत आता प्रणिताच्या व तिच्या कुटुंबाच्या मदतीसाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वत: प्रणिताची फोनवरून चौकशी केली आहे. शिवाय, तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी देखील मनेसे जिल्हाध्यक्षांनी घेतली आहे.

मनसे जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांनी पक्षप्रमुखांना सांगून तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शैक्षणिक पालकत्व स्वीकारत आर्थिक व साहित्याची मदत केली. तर, स्वतः मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रणिताशी दुरध्वनीवरून संपर्क साधत धीर दिला व मदतीचे आश्वासन दिले . प्राणिताने राज ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी बोलताना प्रणिताची आई इंदुबाई मोहन पवार यांना अश्रू अनावर झाले होते .

devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
union minister pratap rao jadhav meet cm devendra fadnavis in buldhana
प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याना दिला हा प्रस्ताव, फडणवीस म्हणाले नक्कीच विचार करू
Image Of Anita Anand
Anita Anand : कोण आहेत भारतीय वंशाच्या अनिता आनंद, ज्यांना मिळू शकते कॅनडाच्या पंतप्रधानपदाची संधी
Prajna pathshala mandal vai Higher Education in Kashi
तर्कतीर्थ विचार: काशीतील उच्चशिक्षण
Former State President of Sahakar Bharti Dr Shashitai Ahire passes away
सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे यांचे निधन
Varsha Gaikwad MP post, Varsha Gaikwad, court ,
वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान, न्यायालयाने निर्णय ठेवला राखून
Disagreements in sports over government authority Controversy over highest sports award again
सरकारच्या अधिकारावरून क्रीडाक्षेत्रात मतभिन्नता; सर्वोच्च क्रीडा पुरस्कार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रणिताला आम्ही मदत केली –

“२०१७ मध्ये या मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावरीली कराटे स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूचा पराभव करून, भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. श्रीलंकेत जाऊन तिथे यश मिळवून या मुलीने देशाचं नाव उज्ज्वल केले आहे. दीड वर्षापूर्वी तिच्या वडिलांचं निधन झाल्याने तिची सध्या हालाखीची परिस्थिती आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ती शिक्षण घेत आहे. आम्हाला असं समजलं की या मुलीची उपासमार होत आहे व त्यांना आर्थिक व अन्य सर्व मदतीची गरज आहे. हे समजल्यानंतर आम्ही मनसे पदाधिकाऱ्यासह तिच्या घरी आलो आणि राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रणिताला आम्ही मदत केली. तसेच, तिच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च मनसेकडून केला जाणार आहे. राज ठाकरे यांनी देखील तिची विचारपूस केली आहे.” अशी माहिती मनसेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगीरे यांनी दिली.

मुलीली पुढे शिकवण्याची माझी खूप इच्छा आहे, पण… –

“माझ्या पतीचे करोना काळात निधन झाले आहे. सध्या आमची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मी तिला नीट शिकवू देखील शकत नाही. मी शेतात काम करते परंतु मला मुलीली पुढे शिकवायची इच्छा आहे.” अशा शब्दांमध्ये प्रणिताची आई इंदूबाई पवार यांनी आपली व्यथा मांडली.

राज ठाकरे यांची मी आभारी आहे –

“मी राज ठाकरे यांच्याशी बोलले आहे. मली श्रीलंकेत कराटेमध्ये सुवर्ण पदक मिळालेले आहे. मला श्रीलंकेला जाण्यासाठी सगळ्यांनी मदत केली होती. परंतु सध्या मला पुढे शिकता येईल अशी आमची आर्थिक परिस्थिती नाही. दीड वर्षांपूर्वी करोना काळात माझ्या वडिलांचे निधन झाले आहे, त्यामुळे मला पाठबळ नाही आणि शिकण्यासाठी आधार नाही. परंतु आता मला राज ठाकरे यांना मदत केली आहे. तू काळजी करू नकोस, शिकत रहा तुला सर्व मदत मिळेल. असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. काल प्रशांत नवगीरे यांनी माझी संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी घेतली आहे, मी त्यांची देखील अत्यंत आभारी आहे.” असं प्रणिता पवार हिने सांगितलं आहे.

Story img Loader