Praniti Shinde : देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम आहेत अशी टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला. त्यानंतर महायुतीला महाप्रचंड असं २३७ जागांचं बहुमत मिळालं. याबाबतच्या प्रतिक्रिया सातत्याने आल्या होत्या. अजूनही त्याबाबतच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) म्हणाल्या, वाढलेल्या मतदार संख्येच्या आकडेवारीवर आम्ही शंका उपस्थित केली आहे. २०१९ ते २०२४ दरम्यान मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळपास ५ लाख मतदार संख्या वाढली होती. लोकसभा निवडणूक २०२४ ते विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान ७५ लाख मतदार संख्या कशी काय वाढली? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही, तोपर्यंत आमचा विश्वास बसणार नाही, असंही त्या म्हणाल्या. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

GBS , Victim of GBS disease, Solapur, GBS disease ,
सोलापुरात जीबीएस आजाराचा संशयित मृत्यू
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य, “सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, सगळ्यांनी…”
Saif attacker tag costs Colaba resident his job, marriage
Saif Attacker Tag : “लग्न मोडलं, नोकरीही गेली..”, सैफवर हल्ला करणारा संशयित या एका आरोपाने कसं बदललं तरुणाचं आयुष्य?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
“रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही”, उदय सामंतांकडून भूमिका स्पष्ट
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम-प्रणिती शिंदे

लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली होती. शांतीत क्रांती करु असं लोक मम्हणाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी कट-कारस्थान केलं. चार महिन्यांत मतदार इतके कसे काय वाढले हा आमचा सरळ प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठ्यांच्या तीव्र भावना होत्या, आता देवेंद्र फडणवीसच त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून थोपवले गेले आहेत. ईव्हीएम सीएम असंच देवेंद्र फडणवीस यांना म्हणता येईल अशी बोचरी टीका प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी केली.

लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजना थांबवण्यात आल्या आहेत-प्रणिती शिंदे

लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्यामुळे अनेक योजना थांबल्या आहेत. केंद्र शासनाचा जो निधी मिळतो त्यापैकी ७० टक्के निधी अद्याप मिळालेला नाही. रस्त्यांची कामं अनेक ठिकाणी थांबवण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजनेचा निधी जवळपास ६० टक्के रक्कम आलेली नाही. अनेक कामं थांबवण्यात आली आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याला जबाबदार भाजपा आहे असाही आरोप प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी केला.

सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी राष्ट्रीय मतदारदिना निमित्त काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे कामकाज करत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, तरीही या संस्थेवर भयंकर अशा दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Story img Loader