सोलापूर : राजकीय लाभासाठी, सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो. मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काश्मीरमध्ये पुलवामा भागात पाकिस्तानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता. पुलवामाचा हा हल्ला घडला नाही तर घडविण्यात आला होता. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्याचा गौप्यस्फोट केला होता. पुलवामा घटनेची संबंधित प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळत नाहीत, अशा शब्दात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.

तर भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनीही आपल्या पठडीतून टीकेचे बाण सोडताना पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सरकारविरूध्द केलेले भाष्य शहीद जवानांचा अपमान आहे, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई

हेही वाचा…सांगलीसाठी ओबीसी-बहुजन पार्टीकडून मैदानात; प्रकाश शेंडगे

सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते या दोन्ही तरूण आमदारांकडून आक्रमक पध्दतीने प्रचार करून एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापत असतानाच आमदार प्रणिती शिंदे यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मुद्यावर मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले.

मागील लोकसभा निवडाणुकांच्या तोंडावर झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला भीषण होता. यात भाजपने शहीद जवानांच्या रक्ताचे राजकारण करून राजकीय फायदा घेतला. ही गोष्ट आपण स्वतः बोलत नाही तर प्रशासनातील जबाबदार अधिकारी सांगतात. पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे मोदी सरकार आजही देऊ शकत नाही, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली.

हेही वाचा…“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप

तथापि, भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी पुलवामा दशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रश्न उपस्थित करून शंका निर्माण करणे हा शहीद जवानांचा अपमान आहे. याबद्दल भाष्य करताना लाज वाटायला हवी, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले.