सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने आपल्या विरोधात आणि कुटुंबीयांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन खोटे आरोप होत आहेत. येणाऱ्या ३०-३५ दिवसांच्या प्रचार काळात आपले चारित्र्यहनन होण्याचीही भीती वाटत असल्याचे काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना काँग्रेस व भाजपकडून एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपकडून आपल्या विरोधात खोटा आणि हिणकस प्रचार केला असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः समाज माध्यमांतून पातळी सोडून प्रचार केला जात आहे. विशेषतः आपले वडील सुशीलकुमार शिंंदे यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप वारंवार करून ते खरे असल्याचे जनतेच्या मनावर बिंबविण्याची हिटलरी पद्धत आवलंबविली जात असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

हेही वाचा – ‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ

प्रणिती शिंदे म्हणाल्या, मी स्वतः उमेदवार असताना माझ्यावर टीका करण्यापेक्षा किंवा मला थेट भिडण्यापेक्षा वडील सुशीलकुमार शिंदे यांना धादांत खोट्या आरोपांच्या माध्यमातून टीकेचे लक्ष्य बनविले जात आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा विकास करण्याऐवजी दक्षिण आफ्रिकेत स्वतःचे चहाचे मळे उभारले आहेत, इथपर्यंत खोटे आरोप केले जात आहेत. भाजपच्या हाती मागील दहा वर्षांपासून सत्ता असताना आमच्या कुटुंबीयांची चौकशी करायला हवी होती. ती का केली नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.