राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारलं आहे. सोलापुरात आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली. तेव्हा प्रणिती शिंदेंनी भाजपावर हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हा चालतात, तेव्हा सर्व महिला भाऊ म्हणून मिठी मारतात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारण्याची हिंमत होईल का?, असा खोचक सवाल प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“हे सरकार गोरगरिबांचं नाही. महिलांचं तर नाहीच नाही. महिलांकडे हे सरकार तुच्छ नजरेने पाहते. महिलांना न्याय मिळवून देणे दूरच पण, त्यांच्यावर अन्याय करणार हे सरकार आहे. इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींची काँग्रेस तुमच्याबरोबर आहे,” असा विश्वास प्रणिती शिंदेंनी व्यक्त केला.

“एका महिलेने राजीव गांधींना भावा समान मिठी मारली. त्यामुळे त्यांचा जीव गेला. राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेत चालत होते. तेव्हा, वयस्कर आणि तरुण महिला राहुल गांधींना मिठ्या मारत होत्या. पण, पंतप्रधान जातात तेव्हा त्यांना मिठी मारण्याची कोणाची हिंमत आहे का? हाच फरक काँग्रेस आणि अन्य पक्षांत आहे,” असा टोला प्रणिती शिंदेंनी भाजपाला लगावला आहे.