Pratibha Pawar in Baramati Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सांगता सभांचं आयोजन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत सभेचं आयोजन केलं आहे. यंदाच्या निवडणुकीतील शरद पवारांची ही सांगता सभा आहे. शरद पवारांनी काही वेळापूर्वी कर्जत-जामखेड येथे पक्षाचे अधिकृत उमेवार रोहित पवारांसाठी प्रचारसभा घेतली. त्यापाठोपाठ शरद पवार इंदापूरला रवाना झाले आहेत. इंदापूरची सभा आटपून शरद पवार बारामतीला जातील. तत्पूर्वी बारामतीत शरद पवारांच्या पक्षाने सांगता सभेची जोरदार तयारी केली आहे. या सभेला पक्षातील अनेक नेते, आमदार, खासदार उपस्थित आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील या सभेला उपस्थित आहे. यावेळी प्रतिभा पवार यांच्या हातातील एका फलकाने सर्वांच लक्ष वेधलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बारामतीमधील प्रचारसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आणलेला फलक प्रतिभा पवारांनी आपल्या हाती घेतला. या फलकावर लिहिलेल्या मथळ्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, असा मथळा त्या फलकावर लिहिला आहे. एका कार्यकर्त्याने बनवून आणलेला हा फलक प्रतिभा पवार यांनी त्यांच्या हातात घेऊन उंचावला.

हे ही वाचा >> Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, “गद्दार घरात बसला आहे, शिवसेना..”

शरद पवारांकडून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचार

८५ वर्षीय शरद पवार हे या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. शरद पवार कधी शेतकऱ्यांच्या बांधावर, तर कधी गावच्या पारावर दिसतात. ते कधी प्रचारसभेत, तर कधी प्रचारफेरीत सहभागी होत आहेत. लहान-मोठ्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन सामान्य जनतेशी संपर्क साधत आहेत. त्यांचा हा कामाचा व्याप पाहून त्यांच्या विरोधकांनाही धडकी भरली आहे. याच गोष्टीला अनुसरून बनवलेला हा फलक प्रतिभा पवार यांना भावला. म्हणूनच त्यांनी तो फलक आपल्या हाती घेतला व सर्वांना दाखवला. बारामतीत या फलकाची चर्चा आहे.

दरम्यान, कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवार म्हणाले, उद्याची २० तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या दिवशी मतदान करण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे त्यादिवशी मतदान केंद्रावर जायचं. जी काही खूण आहे रोहितची त्या खुणेच्या समोर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ त्याच्या पुढचं बटन दाबायचं आणि मोठ्या मतांनी त्यांना विजयी करायचं, हा निकाल तुम्हा सगळ्यांना घ्यायचा आहे. कर्जत-जामखेड या भागामध्ये गेल्या पाच वर्षांपासून रोहितला तुम्ही तुमच्या घरचा प्रतिनिधी मानला, त्यांनी काम केलं. या शहरांमध्ये, या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघांमध्ये जी जी विकासाची काम आहेत त्याच्यात त्यांचे लक्ष आहे. कुकडी धरणाचे पाणी फार मिळत नाही पण काही मिळालं. पण तक्रार आहे नियमितपणे मिळत नाही, त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल.