मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंधन दरवाढी विरोधातील आंदोलनात बैलगाडीवरून भाई जगताप व अन्य काँग्रेस नेते खाली पडल्यामुळे झालेले काँग्रेचे हसू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन केले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगतापही खाली पडले. यावर प्रतिक्रिया देताना दरकेर यांनी म्हटले की, ”राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणा देत असताना माणसाचे तर दुरंच राहिले, पण बैलालाही ते सहन झाले नसावे.” असं म्हणत टोला लगावला.

“राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नाही,म्हणून…”; देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला!

दरकेर म्हणाले, ”इंधन दरवाढी विरोधातील मोर्च्यात एकाच वेळी या बैलगाडीवर अनेक कार्यकर्ते व नेते उभे होते. त्यामुळे बैलगाडीचा एक भाग तुटून वेगळा झाला आणि कार्यकर्ते खाली पडले. कार्यकर्त्यांनी बैलगाडीवर चढतांना तेथील महिलांचाही विचार केला नाही. त्यामुळे हे आंदोलन विस्कळीत आणि अनियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. एका बाजूला राज्य सरकार करोना वाढल्याचे ओरडून ओरडून सांगत असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते व कार्यकत्यांनी आंदोलनाच्या नावाखाली सोशल डिस्टंसिंग फज्जा उडविला व करोनाचे नियमही धाब्यावर बसवल्याचा असा आरोप दरेकर यांनी केला