राष्ट्राचा कारभार चांगल्याप्रकारे चालावा आणि त्यातून देशवासीयांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना देवी महालक्ष्मीकडे केली आहे, असे प्रतिपादन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी केले. मुख्यमंत्री राव हे कोल्हापुरात आले होते. राव यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही देव-धर्म मानणारे लोक आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून महालक्ष्मीचे दर्शन घ्यायची इच्छा होती. आज तिचे बोलावणे आले आणि दर्शनही झाले. यामुळे प्रसन्नचित्त वाटत आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर राव पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.

दरम्यान, अलीकडेच मुख्यमंत्री राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. कोल्हापुरात पोटनिवडणूक सुरू असताना ते आल्याने काही राजकीय संदर्भ आहे का, या बाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही राजकीय विधान करण्याचे टाळले. आपण केवळ देव दर्शनासाठी आलो आहे, असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी करत राजकीय चर्चांना विराम दिला.