महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरच्या आता सरसकट मराठा आरक्षण सरकारने द्यावं अशी मागणी केली आहे. ५ डिसेंबरपासून त्यांच्या सभाही सुरु आहेत. तसंच छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा सामनाही पाहण्यास मिळतो आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या गोष्टी छगन भुजबळांविषयी बोलून दाखवल्या त्यांचा पुनरुच्चार करत छगन भुजबळ यांनी २४ डिसेंबरला माझ्यावर हल्ला होईल आणि माझंही घर जाळलं जाईल असा आरोप केला आहे.

काय म्हणाले आहेत भुजबळ?

जरांगे म्हणाले आहेत मी त्याचा (म्हणजे माझा) कार्यक्रमच करतो. आमच्या हातात दंडुके, सरकारला तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ. एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळचा कार्यक्रमच करतो. २४ डिसेंबरचा एक मेसेज समाज माध्यमांवर फिरतो आहे. नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फार्म हे पाहण्याची इच्छा ज्यांना आहे त्यांनी नावं कळवावीत असा हा संदेश आहे. माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु आहे. प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर यांची घरं जाळली त्याप्रमाणेच माझंही घर जाळलं जाईल. कुणी यावं अशी माझी अपेक्षा नाही. त्यापुढे जाऊन सांगतो आहे, पोलीस वाढवले आहेत. तेव्हा मी चौकशी केल्यावर कळलं भुजबळांवर गोळी चालवली जाईल. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्या मात्र झुंडशाही थांबवा. आज छगन भुजबळ आहे उद्या दुसरं कुणीतरी असेल. तुम्ही कोणीही त्यावर बोलणार नाही का? खऱ्या अर्थाने या प्रश्नाकडे पाहिलं जाणार आहे का? कुणी यावर बोलणार आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Kartik Aaryan’s Surprise Visit to Bhool Bhulaiyaa 3 Theatre Goes Viral – A Girl was Too Busy with Popcorn
कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अ‍ॅटिट्यूड हवा!

हे पण वाचा- “गाढव पाण्याच्या टाकीवर चढवलं कुणी?”, ‘ती’ गोष्ट सांगत छगन भुजबळ यांची मनोज जरांगेंवर बोचरी टीका

कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना सरकाकडून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे. या मराठा कुटुंबांचा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेश होणार आहे. त्याला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मराठा आंदोलनादरम्यान, बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, बीडमधली दंगल ही भुजबळांनीच घडवून आणली होती. त्यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी जरांगे पाटलांच्या आरोपांना उत्तर दिलं. भुजबळ म्हणाले, हे अत्यंत बालिश असे आरोप आहेत. मी बीडला जाऊन इतकी मोठी दंगल करू शकतो का? मुळात मी असं करण्यामागचं कारण काय? तसेच या दंगलप्रकरणी पकडली गेलेली पिस्तुलधारी माणसं मनोज जरांगे यांची आहेत. २४ तास जरांगेंबरोबर राहणारी माणसं बीडच्या जाळपोळप्रकरणी पोलिसांनी पकडली आहेत. छगन भुजबळ म्हणाले, बीडच्या घटनेशी माझा संबंध काय? गेली कित्येक वर्षे मी बीडला गेलो नसेन…आणि तिथे जाऊन मी काय करणार? माझ्याच लोकांची घरं जाळणार का? मी एवढा अमानुष नाही.