राष्ट्रवादी काँग्रेसने काढून घेतलेल्या पाठिंब्यानंतर अल्पमतात गेलेले सरकार आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा यामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगात अखेर राज्यात रविवारपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
राज्याचे राज्यपाल के.विद्यासागर राव यांनी दिलेल्या प्रस्तावार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या क्षणापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात गेल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केंद्र सरकारला पाठविलेल्या अहवालात केली होती. सरकार अल्पमतात गेल्याने चव्हाण यांनी शुक्रवारीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राज्यपालांच्या अहवालानुसार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा