लोकसत्ता, वार्ताहर

जालना : आयपीएल आणि अन्य क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या जालना शहरातील १६ जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली याहे. स्थानिक आमदार अर्जुन खोतकर यांनी अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपास्थित करून कारवाईची मागणी केली होती.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेने क्रिकेट सामन्यांवर यापुढे सट्टा घेणार नसल्याचे बंधपत्र या १६ जणांकडून घेतले आहे. मागील सात वर्षांपासून या संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पंकज जाधव यांना दिले होते. यामध्ये जालना शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयपीएल आणि अन्य क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणारे १६ जण पोलिसांच्या रेकॉर्ड वर आढळून आहे. त्या सर्वांकडून बंधपत्र करून घेण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात बंधपत्र घेतलेल्यांची नावे मात्र टाळण्यात आली आहेत.

विधिमंडळ अधिवेशनात गेल्या सोमवारी आम‌दार अर्जुन खोतकर यांनी जालना शहरात क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळवला जात असून त्यामुळे अनेक जण उद्ध्वस्त झाल्याचे तसेच काही जणांनी आत्महत्या केल्याचे सांगितले होते. जालना शहरात राजरोस हा सट्टा सुरु असून तो खेळविणारांची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगून दोन जणांची नावेही त्यांनी घेतली होती. क्रिकेटवरील सध्या सोबतच ऑनलाईन मटका, अवैध वाळू उपसा चालू असल्याचेही खोतकर यांनी सांगितले होते. यासेदभति पोलिसांवर टीका करून जालना शहरात आयपीएल भाणि अन्य क्रिकेट सामन्यांवरील सट्टा थांबविण्याची मागणी त्यांनी केली होती.