राजकारणात येण्यापूर्वीपासून संत भगवानबाबा यांचा मी भक्त आहे. त्यांचा आशीर्वाद व जनतेच्या सहकार्यामुळे केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामुळे कामकाज सुरू करण्यापूर्वी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुढील वर्षी सुवर्णमहोत्सवी सप्ताहास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गडावर आणण्यास आपण प्रयत्न करु, अशी ग्वाही देताना केंद्रीय ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून खेडय़ांचा चेहरामोहरा बदलणार असल्याचेही केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.
बीड जिल्हय़ाच्या हद्दीवरील श्री क्षेत्र भगवानगड येथे ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी शनिवारी भगवानबाबा समाधीचे दर्शन घेतले. गडाचे महंत नामदेवशास्त्री महाराज व सचिव गोिवद घोळवे यांनी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित होते. मुंडे म्हणाले की, विद्यार्थिदशेत असतानाच संत भगवानबाबा व आपली भेट झाली. त्या वेळेपासून भगवानगडावर आपण भक्त म्हणून येतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे बारा आमदार असताना मी कसा निवडून येईल? असे अनेकांना वाटत होते. मात्र, आमदार पंकजा पालवे सर्वाना भारी ठरल्या. माझा जन्म पाचशे लोकवस्तीपेक्षा कमी असलेल्या खेडय़ात झाला. नरेंद्र मोदी यांनी केंद्रात ग्रामविकास खात्याची जबाबदारी दिल्यामुळे खेडय़ांची सेवा करण्याची संधी मिळाली. खेडय़ांचा चेहरामोहरा बदलण्याची ग्वाही त्यांनी दिली. पुढील वर्षी ६ जानेवारीपासून होणाऱ्या संत भगवानबाबा यांच्या सुवर्णमहोत्सवी सप्ताहास पंतप्रधान मोदी यांना आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. गडाचे महत्त्व राज्याला माहीत आहे; पण आता आपण केंद्रात असल्यामुळे देशालाही कळेल, असेही त्यांनी संगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा