‘उतावीळ नवरा व गुडघ्याला बािशग’ ही म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान झाल्याच्या थाटात भाषणे देत फिरत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी औसा येथील सभेत लगावला.
उस्मानाबाद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी ही सभा झाली. दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार जनार्दन वाघमारे, आमदार दिलीपराव देशमुख, बसवराज पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण व वैजनाथ िशदे, उस्मानाबाद जि. प.चे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांची उपस्थिती होती.
भूकंपाच्या वेळी पवारांनी काय केले? हे लातूरच्या सभेत विचारण्यात आले. त्याचा समाचार घेताना, ‘बरं बाबा, भूकंपानंतर आम्ही काही केले नाही. सगळे काही मोदी, वाजपेयी, अडवाणी यांनीच केले’ असा उपहासात्मक टोला पवार यांनी लगावला. ज्या माणसाला देशाचा इतिहास माहीत नाही, अशा माणसाच्या हातात देशाची सूत्रे देणार काय?, गुजरातेत ज्यांच्याबद्दल संतापाची लाट आहे त्यांच्या हातात देशाची सूत्रे देणार काय? ज्यांनी गुजरातचा विकासदर १७ टक्क्यांवरून ८ टक्क्यावर आणला, अशी अधोगती करणाऱ्या माणसाच्या हातात देशाची सूत्रे देऊन सर्वच राज्यांचा विकासदर खाली आणून विकास करणार काय? असा सवाल त्यांनी केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक दिलीप सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीत या वेळी प्रवेश केला. त्यामुळे औसा तालुक्यातील शिवसेनेला िखडार पडले आहे.
‘सतानी संकट घालवा’
माध्यमे व व्यापाऱ्यांना हाताशी धरून मोदींचे वादळ घोंघावत आहे. या वादळाने देशाच्या एकात्मतेला तडा जाणार असून देशावर येणारे हे सतानी संकट घालवा, असे आवाहन आमदार दिलीपराव देशमुख यांनी केले.

Story img Loader