कोल्हापूरमध्ये अटकेत असलेल्या गुन्हेगाराने उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष बाब म्हणजे अरविंद साबळे हा गुन्हेगार कोल्हापूर येथील कळंबा तुरुंगामध्ये सध्या अटकेत आहे. अरविंद साबळेला एमपीडीअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा असल्याने अरविंद साबळेने पिंपरी चिंचवड गाठले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अरविंद साबळेला विशेष बाब म्हणून निवडणूक आयोगाने निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. अरविंद साबळे ब’ प्रभागातून बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. अर्ज भरल्यानंतर अरविंद साबळेला पुन्हा कोल्हापूरमधील तुरुंगात नेण्यात आले. अरविंद साबळेवर पिंपरी पोलीस स्थानकात खंडणी मागणे, मारामारी करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पिंपरी पोलीस निरीक्षक मुगळीकर यांनी दिली आहे.
First published on: 03-02-2017 at 16:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prisoner comes out to file nomination form for pimpri chinchwad municipal corporation election