कराड : सत्तेचा उपयोग सार्वजनिक जनहितासाठी होणे गरजेचे आहे. त्याच धोरणातून मी आजपर्यंत कार्यरत राहिलो आहे. मुख्यमंत्री असतानाही मी वैयक्तिक विकासापेक्षा सार्वजनिक विकासाला प्राधान्य दिले. सध्याही माझे तेच धोरण असून, आम्हाला सत्ता मिळाली तर कराड जिल्हा करणार, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाविकास आघाडी’तर्फे ‘काँग्रेस’चे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार, आमदार पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या प्रचारार्थ कराडमध्ये युवक मेळाव्यात बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा – अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा

हेही वाचा – मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या

उदयसिंह म्हणाले, देव आणि धर्म ही वैयक्तिक आणि देव्हाऱ्यात पूजन करण्याची बाब. परंतु, त्याचे राजकारण करणे चुकीचे आहे. भाजपने राज्यात विकास करण्याऐवजी गलिच्छ राजकारण करून नेहमी अस्थिरता ठेवत स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या ना कोणत्या कारणावरून राज्यात अस्थिरता निर्माण करायची, असा भाजपचा सततचा डाव राहिला आहे. देशातील युवकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करून, भाजप राजकीय स्वार्थ साधत असल्याची टीका उदयसिंहांनी या वेळी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan campaign in karad promised to make karad district ssb