कराड : केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील ते विधान हे अत्यंत दुर्दैवीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती द्वेषपूर्ण भावना भरलेली आहे, याचेच त्यातून प्रदर्शन झाल्याचा निशाणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे माध्यमांशी बोलताना साधला.

काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कायमच विरोध केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, भाजपाने वैचारिक हल्ला करावा. मात्र, त्यांची द्वेषपूर्ण वक्तव्यातून समाजात विभाजन करण्याची प्रवृत्ती आहे. लोकसभेला मोदींनी मुस्लिम समाजाला लक्ष्य केल्याचे सांगत भाजपाला देशात पुन्हा वर्णव्यवस्था आणायची असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Portfolio Distribution : महायुतीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आजच होणार? विधान परिषदेत शिवसेनेच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

राज्यातील निवडणुका होऊन महिना संपत आले तरी खातेवाटप झालेले नसल्यासंदर्भात चव्हाण म्हणाले, सध्याचे सरकार सत्तेची वाटणी आणि राज्याचा खजिना लुटण्याकरता तयार झाले आहे. राज्यात सत्तेची साठेमारी चालू असून, अतिशय यश मिळाल्याने ते पचवणे त्यांना अवघड जात असल्याची परखड टीका चव्हाणांनी केली.

हेही वाचा – Metro 3 : मुंबईकरांसाठी खुशखबर! कुलाबा ते बीकेसी मेट्रो ३ चा प्रवास ‘या’ महिन्यापासून होणार सुरू; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती!

बेळगावला गुरुवारपासून काँग्रेस अधिवेशन

अखिल भारतीय काँग्रेसतर्फे गुरुवारपासून (दि. २६) कर्नाटकातील बेळगाव येथे दोन दिवसीय अधिवेशन घेतले आहे. महात्मा गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्याला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होणार आहे. पहिल्या दिवशी बैठक व दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जाहीर अधिवेशन होणार आहे. त्याला देशातील काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Story img Loader