माळीनगर (ता. माळशिरस) येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेचा उद्देश सफल झाला नसल्याचे मुख्यमत्र्यांनी नुकतेच म्हटले होते. त्याबद्दल बोलताना पवारांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. जिल्ह्य़ातील कळीचा मुद्दा असणारा कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र राज्यपालांनी अर्धवट प्रकल्प अगोदर पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने व निधीअभावी हा प्रकल्प लवकर होणार नसल्याचे ते म्हणाले. तर माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविण्यासाठी आणखी बराच वेळ असल्याचे सांगितले. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांना अद्याप पकडले नसले तरी पोलीस योग्य दिशेने तपास करीत आहेत. यापूर्वी आपण गृहमंत्री असतानाही एका महत्त्वाच्या प्रकरणाच्या तपासाला ११ महिने लागले होते. या प्रकरणाचाही तपास लागेल.

Story img Loader