ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवायचं असेल, तर भाजपाचं सरकार घालवलं पाहिजे. त्याची सुरूवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत पराभव झाला, तर विधानसभेत आव्हान राहणार नाही, असं विधान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जागावाटपावरून महाविकास आघाडीत अलबेल आहे का? असा प्रश्न विचारल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली शिवसेना ( ठाकरे गट ), राष्ट्रवादी, काँग्रेससह काही पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहोत. भाजपाच्या विरोधात एकास-एक उमेदवार उभे करू. महाराष्ट्रात तिन्ही पक्ष जागावाटपासाठी एकत्र बसू.”

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

“आपापल्या पक्षांची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करणार. त्यामुळे थोडी वादावादी होईल. पण, ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवण्यासाठी भाजपाचं सरकार घालवलं पाहिजे. त्याची सुरूवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत पराभव झाला, तर विधानसभेत आव्हान राहणार नाही,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

हेही वाचा : “ही धमकी आहे का, मला संपवून टाकाल का?”; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर सुषमा अंधारे आक्रमक, म्हणाल्या…

“लोकसभेत पराभव स्विकारावा लागला, तर मग विधानसभा निवडणूक होणार नाही. कारण, पुन्हा लोकशाही राहणार नाही, अशी माझी खात्री आहे,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

हेही वाचा : “महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला मिळो ही देवीचरणी प्रार्थना”, विधानसभा अध्यक्षांचं विधान चर्चेत!

‘मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं’, असं विधान ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी ललिल पाटीलनं म्हटलं. यावर प्रश्न विचारल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “तेलगी प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावं आली. नंतर ते प्रकरण दडपण्यात आलं. तसेच, सत्तेतील सरकार हे प्रकरण दडपून टाकतील. कारण, यात काही मंत्र्यांचा संबंध असल्याचं बोललं जात आहे.”

Story img Loader