दक्षिण मुंबई लोकसभेची जागा काँग्रेसला मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत देवरा यांनी रविवारी ( १४ जानेवारी ) प्रवेश केला. देवरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर काँग्रेसला मोठा फटका बसल्याची चर्चा केली जात आहे. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.

“काँग्रेसच्या राजकारणात मिलिंद देवराचांना फारसा सहभाग दिसला नाही. शिंदे गटात जाणं हा देवरांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडून गेलं, तर नुकसान होतेच. पण, आता किती नुकसान होईल, हे मुंबई काँग्रेसचे नेते ठरवतील,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी संवाद साधत होते.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा

हेही वाचा : “पंतप्रधानांनी काँग्रेसला चांगलं म्हटलं, तरी…”, शिवसेनेत प्रवेश करताच मिलिंद देवरांची टीका

“काँग्रेसच्या राजकारणात देवरांचा सहभाग दिसला नाही”

“मिलिंद देवरांना दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवायची होती. पण, तीन पक्षांची आघाडी झाल्यानं ती जागा मिळणं शक्य नव्हतं. राज्यसभेसाठी देवरांनी प्रयत्न केले होते. पण, संसदेत जाण्याचा विचार करूनच देवरा राजकारण करत होते. काँग्रेसच्या राजकारणात देवरांचा सहभाग दिसला नाही. हा देवरांचा व्यक्तीगत निर्णय आहे. याची फार व्यापक चर्चा करण्याची गरज नाही,” असं पृथ्वीराच चव्हाणांनी म्हटलं.

“कुणीही पक्ष सोडून गेलं, तर नुकसान होतेच”

“दक्षिण मुंबई ही हक्काची जागा असल्याचं देवरांना वाटत होते. पण, आघाडीच्या वाटपात ती मिळणं शक्य नव्हतं. तेव्हापासून देवरा पक्ष सोडतील हे अपेक्षित होतं. कुणीही पक्ष सोडून गेलं, तर नुकसान होतेच. आता किती नुकसान होईल, ते मुंबई काँग्रेसचे नेते ठरवतील,” असं चव्हाणांनी सांगितलं.

हेही वाचा :  मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घेतला हाती; म्हणाले, “मी काँग्रेस सोडेन वाटलं नव्हतं, पण…”

“मिलिंद देवरांना पक्षानं खजिनदार केलं होतं”

“दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेनं दोन वेळा जिंकली आहे. त्यामुळे शिवसेनेला ही जागा सोडा असं सांगा हे व्यवहारिक नव्हतं. मिलिंद देवरांना पक्षानं खजिनदार केलं होतं. पण, त्यातून त्यांचं समाधान झालं नाही,” असंही चव्हाण म्हणाले.

“काहीजण पक्ष सोडून गेले, तर…”

हा राहुल गांधींना धक्का आहे का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं, “देवरांनी पक्ष सोडल्यामुळे राहुल गांधींना धक्का वगैरे काही बसला नाही. काही दोन-चार लोक गेलं, तर पक्षात काहीजण आले सुद्धा.”