कराड : माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांना नाइलाजाने काम करावे लागले असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्याबरोबर काम करायचे की नाही हे त्यांनी ठरवायचे होते, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांनी त्यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमवेत चार वर्षे वरिष्ठांच्या सांगण्यावरून नाइलाजाने काम करावे लागल्याची खदखद अजित पवार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. त्यावर काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सन २०१० ते २०१४ या कालावधीत आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते. त्या वेळी या दोघांमधील ताणतणाव आणि विविध विषयांवरून उडालेले खटके हे गाजले होते. अखेर याच वादातून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करत सरकारचा पाठिंबा काढून घेत आघाडीतून बाहेर पडले होते. यानंतरही या दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप यापूर्वीही घडलेले आहेत.