ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज कराड येथे जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आमच्या भेटीत राजकीय चर्चा झाली. उद्याची रणनीती तत्काळ ठरवता येणार नाही. आमच्या नेतृत्त्वाला विनंती केली आहे की दोन दिवसांत काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक घ्या. तळागाळात काय मतं हे जाणून घेण्याची विनंती केली.”
पत्रकार परिषदेतून मांडणार जनतेचे प्रश्न
तसंच, विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत ते म्हणाले, “विधानसभेत आम्हाला विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही. त्यामुळे विधिमंडळात फार मोठी लढाई होणार नाही. लोकांचे प्रश्न बाहेरच मांडायचा प्रश्न करू. पत्रकार परिषद आणि बैठका घेण्याचं काम सुरू राहणार.”
हेही वाचा >> यंदा विरोधी पक्षनेतेपद रिक्त? संख्याबळ नसतानाही पूर्वी जनता पक्ष, शेकापला संधी
एकनाथ शिंदे यांची टीका
विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेता बनवण्याएवढंही संख्याबळ राहिलेलं नाही. एवढा मोठा हा विजय आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला डिवचलं आहे.
मविआला विरोधी पक्षनेते पद मिळण्याची किती शक्यता?
विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. लोकसभेत यूपीएकडे आवश्यक संख्याबळ असतानाही कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने काँग्रेसला २०१४ आणि २०१९ मध्ये विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. हेच सूत्र भाजपकडून विधानसभेत कायम ठेवले जाईल, अशी चिन्हे आहेत.
संख्याबळ नसतानाही भाजपाला मिळालं होतं विरोधी पक्षनेते पद
द
दिल्लीतही आप सरकारने भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. राज्यातील महायुतीचे सरकार पुरेसे संख्याबळ नसताना किंवा महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करणार का, हा प्रश्न आहे.