आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या जागावाटपारून महाविकास आघाडीच्या घटक पक्षात कलगीतुरा सुरु झाल्याचं दिसत आहे. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या एका विधानावरून महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हाच मोठा भाऊ आहे, असं विधान अजित पवारांनी केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं अजित पवार काय म्हणाले?

“यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा अधिक असायच्या. तेव्हा जागावाटपात आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी जागा मिळायच्या. आता आम्ही काँग्रेसचे मोठे भाऊ झालो आहोत. काँग्रेसचे ४४, तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत,” असं अजित पवार यांनी म्हटलं. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “आपल्या देशाला लहरी राजा लाभला आहे, हा राजा असेच…” संजय राऊत यांची टोलेबाजी

“विधान करण्यात चुकीचं नाही”

“आजच्या स्थितीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबर, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन नंबरला आहे. त्यामुळे काही विधान करण्यात चुकीचं नाही. पण, अशा वक्तव्यांना फारसं महत्वं नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

हेही वाचा :म्हणाले, “लॉन्ड्रीमध्ये गुजरातहून आणलेली धुलाई पावडर…”

“आम्ही घमेंडी नव्हतो…”

अजित पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलंय. “आम्ही मोठे होतो, तेव्हा कधीच गर्व केला नाही. त्यांनीही गर्व करू नये. आम्ही मोठेपणाची घमेंड केली नाही. अजित पवार यांनी काय भाष्य करावे, यावर बोलणार नाही,” असं पटोले यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan reply ajit pawar ncp big party in mahavikas aghadi statement ssa