कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले काँग्रेस पक्षातील स्थान ए, बी, सी, की डी आहे हे आधी तपासावे. पक्षातील त्यांच्या सहकाऱ्यांनाच चव्हाणांचा पक्षातील दर्जा कोणता हे विचारले, तर ते याबाबत जाहीरपणे नाही पण, खासगीत सांगतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  चव्हाण यांच्या टीकेचा समाचार घेतला.

 ‘सामना’मधील अग्रलेखातून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात आलेल्या  टीकेला उत्तर देताना पवारांनी आपण याला महत्त्व देत नसल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली. साताऱ्यात पवार पत्रकारांशी बोलत होते.  पृथ्वीराज चव्हाण यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस किती काळ आमच्याबरोबर राहील हे माहिती नाही, असे सांगत राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाच डिवचले होते. याबाबत पवार यांनी  पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेचा समाचार घेतला. महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाटय़ रंगत असल्याने आघाडीच्या अस्तित्वाबाबत चर्चा असल्याचे विचारले असता, पवार यांनी प्रत्येकाची वेगवेगळी मते असल्याने ही विसंगती दिसत असल्याचे सांगितले. परंतु आमच्यात गैरसमज नाहीत असे स्पष्ट केले.

On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sharad Pawar on chhagan Bhujbal Yeola Assembly Election
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासमोर येवला मतदारसंघ राखण्याचे आव्हान; शरद पवार भुजबळांच्या विरोधात आक्रमक का?
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
Ajit Pawar on a secret Adani Amit Shah meeting
राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो!
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
narendra modi criticized congress
“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!

पृथ्वीराज चव्हाण सक्षम नेते, पटोलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : भाजपच्या हुकूमशाहीविरोधात लढणारे पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सक्षम नेते आहेत, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या  पटोले यांनी शरद पवारांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची क्षमता असलेले ते नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दात पटोले यांनी चव्हाण यांची बाजू उचलून धरली.