सांगली : महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गरिबी हटाव व महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी परिश्रम घेतले. गांधी यांचे देशावर फार मोठे ऋण आहेत. लोकशाही व स्वातंत्र्य रक्षण हेच गांधीजींना अभिवादन होय, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. गुरुवारी हुतात्मा दिनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व स्टेशन चौकात पुतळ्यास पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, कार्याध्यक्ष अनिल मोहिते, पैगंबर शेख, अय्याज नायकवडी, गुलाबराव भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्तावित मौलाली वंटमोरे यांनी केले व आभार विठ्ठलराव काळे यांनी मानले. या वेळी माजी पीएसआय सुनील भिसे, प्रमोद आवळे, प्रदीप पाटील, प्रशांत देशमुख, सीमा कुलकर्णी, मीना शिंदे, सुरेश गायकवाड, अपंग सेल प्रथमेश शेटे, इंटकचे जिल्हाध्यक्ष डीपी बनसोडे, विक्रम पाटील, मुफित कोळेकर, अनिस बेपारी, शकील गोधड, गणेश वाघमारे, महादेव देवकुळे, सचिन आवळे, अभिजित मोरकणे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj patil asserted that protection of democracy and freedom is a salute to gandhiji sud 02