अलिबाग : पुण्याहून रायगडच्या दिशेने येणाऱ्या खाजगी बसला ताम्हणी घाटात अपघात झाला. चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने बस उलटली यात पाच जण दगावल्याची प्राथमिक माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नाचे वऱ्हाड घेऊन बस महाडच्या दिशेने येत होती त्यामुळे घाटात एका तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस कडेला जाऊन उलटली. या अपघातात पाच जण बस खाली चिरडले गेले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. २५ जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

आणखी वाचा-Daily Fuel Prices Change : आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे भाव, पाहा तुमच्या शहरांत काय आहे स्थिती?

मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष यांचा समवेश आहे. संगीता धनंजय जाधव,गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे आहे. एका मृतांची ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मदत व बचाव कार्याला सुरुवात केली बसमधील जखमी व्यक्तींना माणगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…