रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिक असलेल्या सडामिऱ्या-जाकीमिऱ्या गावातील १७६.१४९ हेक्टर खाजगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना २९ जुलैला जारी झाली आहे. विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग धंद्याला चालणा मिळावी, नवे उद्योग येण्यासाठी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. लॉजिस्टिक पार्क हे एक औद्योगिक क्षेत्र आहे, जे विशेषतः विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी, पॅकेज करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी उभारले जाते. याकरिता १७६, १४९ हेक्टर क्षेत्र भुसंपादीत करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Amruta Fadnavis :”स्टंटमॅन लोकांनी…” लाडकी बहीण योजनेवरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

हेही वाचा – बनावट बांधकाम परवाना घोटाळ्यात चौघांवर फौजदारी कारवाई, सोलापूर महापालिकेतील गैरप्रकार

खाजगी क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे प्रकरण ६ च्या तरतूदी लागू केल्या आहेत. हे क्षेत्र कलम २ खंड (ग) नुसार अधिसूचित करण्याचा प्रस्तावास अधिनियमाच्या कलम ३२ (१) पुर्वी खालील अटीच्या अधीन राहून क्षेत्र अधिसूचित क शासन मंजूरी दिली आहे. खाजगी क्षेत्राच्या सदर्भात भूसपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकताचा हक्क अधिनियम २०१३, मधील तरतूदीनुसार नुकसान भरपाईची दराची रक्कम उच्चतम दराने द्यावी व या क्षेत्रातील बहुतांश भूसंपादन हे संमतीने संपादीत करण्यात यावे, असे स्पष्ट म्हटले आहे. भूसंपादन कार्यवाहीसाठी रत्नागिरी प्रांताधिकारी यांची नियुक्ती केली आहे. मात्र ही अधिसूचना जारी झाल्यापासून स्थानिकांनी या प्रकल्पाविरोधात आवाज उठविला आहे. परंतु या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.