शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (२९ जुलै) ठाण्यात हिंदी भाषिक कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणत टीका केली. याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. “आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली”, असं खळबळजनक विधान संजय शिरसाट यांनी केला. हा दावा करताना त्यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचाही उल्लेख केला. यावर आता स्वत: प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, अशी टीका प्रियंका चतुर्वेदींनी केली. त्यांनी ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून…”; ‘त्या’ नेत्याचा उल्लेख करत शिंदे गटाचा दावा, म्हणाले…

प्रियंका चतुर्वेदी ट्वीटमध्ये म्हणाल्या, “मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. ज्याने ५० खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे. ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपाने त्यांना त्यांच्याबरोबर ठेवलं आहे.”

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते?

“ठाण्यातील मेळाव्यात केलेल्या भाषणात प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना माफी नाही, असं म्हटलं. प्रियंका चतुर्वेदी खरं तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यावेळी अत्यंत भयानक वक्तव्य केलं होतं. खैरेंनी सांगितलं की, आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली,” असं विधान संजय शिरसाट यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chaturvedi first reaction on sanjay shirsat statement get mp post for looks beauty aaditya thackeray rmm
Show comments