पुण्यातल्या प्रोबेशनरी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण त्यांची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. याची कारणही तशीच आहेत. पूजा खेडकर या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत. पूजा खेडकर यांनी चमकोगिरी केल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणे, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्स अॅप मेसेज करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई या संबंधीची मागणी वारंवर केली. तसंच परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून याबाबत विचारणा केली. ज्यानंतर त्यांची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे.
पूजा खेडकर यांचे कारनामे
पूजा खेडकर प्रोबेशन कालावधीतही असतानाही अधिकारी असल्याच्या थाटात राहात होत्या. त्यांच्या सगळ्या थाटाच्या सुरस कथा आता समोर येत आहेत. नियम असं सांगतो की खासगी कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावणं योग्य नाही. मात्र पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी कारवर महाराष्ट्र शासन असं स्टिकर लावलं होतं. तसंच खासगी कारला लाल आणि निळा दिवाही लावता येत नाही. तो दिवाही त्यांनी त्यांच्या ऑडी कारला लावला होता. खासगी कारला लाल-निळा दिवा लावून येणाऱ्या या अधिकारी कोण? अशी चर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात होत असे.
Murlidhar Mohol: मुलीधर मोहोळ यांनी सांगितलं पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचं नियोजन
वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चेंबर बळकावलं
पूजा खेडकर यांचे वरिष्ठ मुंबईत आल्यानंतर पूजा खेडकर यांनी त्यांच्या वरिष्ठाचं चेंबर बळकावलं आणि तिथे स्वतःच्या नावाची पाटी लावली होती. तसंच वरिष्ठांच्या चेंबरमध्ये असलेलं सामान बाहेर काढलं होतं आणि तिथे आपलं सामान ठेवल होतं. या वर्तनाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दिला आहे. या अहवालात जिल्हाधिकाऱ्यांनी, ‘माझे कार्यालय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी हवं, ‘मला कार्यालयाबाहेर शिपाई हवा’ आणि ‘हीच कार हवी’ असे हट्ट पूजा खेडकर यांनी केल्याची बाब नमूद आहे. तसंच अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तिथल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांशी उर्मटपणे बोलतात. ‘तुम्ही सगळे माझ्या मुलीला त्रास देत आहात, आयुष्यात तुम्हाला तिच्याएवढी पोस्ट मिळणार नाही. माझ्या मुलीला त्रास दिलात तर भविष्यात तुम्हाला याचा त्रास होईल अशी धमकीही देतात. अशीही चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्तुळात होती.
सुहास दिवसेंनी दिलेल्या अहवालात काय काय गोष्टी नमूद आहेत?
श्रीमती पूजा खेडकर यांनी पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच कार, निवासस्थान आणि शिपाई यांच्याबाबत मागणी केली
पूजा खेडकर यांना स्वतंत्र कक्ष असणारी बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली होती, मात्र या कक्षाला बाथरुम अटॅच नसल्याने त्यांनी ती नाकारली
यानंतर खनिकर्म शाखेजवळ अटॅच्ड बाथरुम असलेलं व्हिआयपी सभागृह शोधलं आणि तिथे आसनव्यवस्थेची मागणी केली.
या कक्षातील जुन्या इलेक्ट्रीक फिटिंग बदलून नवी इलेक्ट्रीक फिटिंग करा असे सांगितले.
जिल्हाधिकारी यांच्या कक्षाशेजारी माझी आसन व्यवस्था करावी अशी मागणी केली. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाशेजारीच माझा कक्ष हवा ही मागणी केली.
१८ ते २० जून २०२४ या कालावधी अपर जिल्हाधिकारी मंत्रालयात आले होते त्यावेळी पूजा खेडकर यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वसंमती न घेता अँटीचेंबरमधील सर्व साहित्य सोफा, टेबल, खुर्च्या हे बाहेर काढलं. त्यानंतर महसूल सहाय्यक यांना बोलवून स्वतःच्या नावाची लेटर हेड, व्हिजिटिंग कार्ड, पेपरवेट, राष्ट्रध्वज, नेमप्लेट, राजमुद्रा, इंटरकॉम उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या.