शहरातील पाच हजार फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्डचे वाटप करण्याच्या महापालिकेचा उपक्रम अडचणीत आला आहे. बायोमेट्रिक कार्डमध्ये अनेक त्रुटी असल्याने  फेरीवाले कृती समितीने ही कार्डे फेरीवाल्यांनी स्वीकारू नयेत, असे आवाहन गुरुवारी झालेल्या बैठकीत केले. त्रुटींची मांडणी करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी दोन दिवसांत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना भेटण्याचा निर्णयही बठकीत घेण्यात आला.
फेरीवाल्यांचा सव्‍‌र्हे केल्यानंतर महापालिकेतर्फे बायोमेट्रिक कार्ड वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या उपक्रमामध्ये अनेक अडचणी असल्याचे मत फेरीविक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. फेरीवाला कृती समितीची बठक सुभाष वोरा यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यामध्ये या धोरणावर टीका करण्यात आली.
महापालिकेने वितरित करावयाच्या बायोमेट्रिक कार्डाची मुदत कायद्यानुसार तीन वर्षांची असताना फक्त एक वर्षांसाठीचे कार्ड वाटप करण्यात येत आहे. त्यातही सहा महिने उलटल्यानंतर कार्ड देऊन फेरीवाल्यांची बोळवण करण्यात येत आहे, अशी टीका दिलीप पवार यांनी केली. माजी महापौर नंदकुमार वळंजू, माजी नगरसेवक अशोक भंडारे, रघुनाथ कांबळे, राजेंद्र महाडिक, समीर नदाफ, मारुती भागोजी यांनी महापालिकेची कृती एकतर्फी असून कोणीही फेरीवाल्यांनी ती स्वीकारू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader