महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती येथील संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. इस्लामपूर येथे झालेल्या त्रवार्षिक राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले.
नवीन राज्य कार्यकारिणीत मराठवाडय़ाचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव, विदर्भचे विजय सालंकार, खान्देशचे डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर, कोकणचे डॉ. प्रदीप पाटकर, दक्षिण महाराष्ट्राच्या प्रा. तारा भवाळकर, पश्चिम महाराष्ट्रचे अशोक ढिवरे यांचा समावेश आहे. संघटनेचे राज्य मुख्य सचिव म्हणून सुशीला मुंडे (डोंबिवली), मिलिंद देशमुख (पुणे), माधव बावगे (लातूर) यांचा समावेश आहे. याशिवाय इतर विविध समित्यांची घोषणा यावेळी करण्यात आली.

Story img Loader