वंचित, उपेक्षित, शोषित घटकाला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून बाळासाहेब काकडे आणि अग्नीपंख फौंडेशनची टीम सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहे. त्याचे कार्य प्रेरणादायी आहे. अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा येथून प्रेरणा सायकल वारीने चोंडी येथील माझ्या निवासस्थानी येऊन मला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. महाशिवरात्रीच्या दिवशी मिळालेला हा अनोखा सन्मान प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी केले.
श्रीगोंदा येथील अग्निपंख फाऊंडेशन यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित श्रीगोंदा ते चौंडी या १४ व्या प्रेरणा सायकलवारीची समाप्ती आज चोंडी येथे झाली. यावेळी श्रीगोंदा येथील सायकल पटूंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारकास भेट देवून मानवंदना दिली. त्यानंतर अग्नीपंख फौंडेशन आयोजित जीवनगौरव पुरस्कार सोहळा व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना प्रा राम शिंदे बोलत होते.
बुधवारी चौडी (ता जामखेड) येथे झालेल्या कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा माजी मंत्री बबनराव पाचपुते, वीरपत्नी रंजना काळे, मोहीनी म्हस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुरुवातीला सायकल पटू गणेश श्रीराम यांच्या पत्नी उर्मीला श्रीराम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. श्रीगोंदा येथे सायकल वारी शिवदुर्गचे संघटक संतोष भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. तर ११ दिवसांमध्ये नाशिक ते अयोध्या असे १४७९ किमीचे अंतर सायकलवर पार करणाऱ्या श्रीगोंदा येथील कुमारी राजकिशोरी अर्जुन लांडगे हिला सन्मानपत्र प्रदान करून प्रा राम शिंदे यांनी तिचे कौतुक केले.
यावेळी बोलताना सभापती प्रा राम शिंदे म्हणाले की, सामान्य कुंटुबातील एखाद्या कार्यकर्त्यांला सरपंच पदापासून विधान मंडळातील उच्च पदा वर पोहचण्याचा प्रवास हा सध्याच्या काळात सोपा राहिलेला नाही. पण कुठेतरी जनमाणसाचे आर्शीवाद कामी आले. राजकिय जीवनात माझे अनेक सत्कार गौरव झाले अग्नीपंख टीम मधील शाळकरी मुल महिला जेष्ठ नागरीक यांनी सायकल वर येऊन माझा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला हे आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही.मी अग्नीपंख फौंडेशन जे उपेक्षित घटकांसाठी निस्वार्थ भावनेने काम करीत हीच प्रेरणा घेऊन माझी कार्यपद्धती चालू असते, भविष्यात अग्नीपंख फौंडेशनला जिथे कुठे माझी मदत लागेल तिथे सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असेही यावेळी प्रा राम शिंदे म्हणाले.
प्रा शिंदे पुढे म्हणाले की, पराजयाच्या नैराश्याच्या गर्तेत न जाता, आणखीन त्यातून प्रेरणा घेऊन लोकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे, आपण आपल्या जीवनात ज्या परिस्थितीचा मुकाबला केला, संघर्ष केला, त्याच्यातून लोकांच्या वाट्याला संघर्ष येऊ नये. लोकांना काही मदत करता येईल का ? ही भूमिका ठेवण्याची आपण नेहमीकरिता भूमिका ठेवली आणि तसेच मार्गक्रमण सुरू आहे. त्यामुळेच पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली. मिळालेल्या संधीच्या माध्यमांतून जनतेने प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव तत्पर असेन असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले कि, प्रा राम शिंदे हे भाग्यवान आहेत. कमी वयात त्यांनी मोठी उंची गाठली आहे. आई वडील अशिक्षित, कुणाचा आधार नसताना त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. अग्नीपंख फौंडेशनने योग्य लोकप्रतिनिधींचा सन्मान केला आहे. अग्नीपंख टीम निस्वार्थ भावनेने काम करत आहे.
यावेळी नवनाथ खामकर यांचेही भाषण झाले प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केले. यावेळी वृध्देश्वर मल्टीस्टेटचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे, राजेंद्र म्हस्के भाऊसाहेब कोळपे बाळासाहेब गांधी महेश चौधरी शितल धुमाळ उपस्थित होते. सुत्रसंचलन विशाल चव्हाण तर आभार गोपाळराव डांगे यांनी मानले.
सहभागी सायकलपटू
सिध्देश रणसिंग, आरोही डांगे, राजनंदीनी रसाळ, शिवन्या डांगे, संपदा खामकर, सानिया ससाणे, रेश्मा डांगे ,गौरी कोहळे, मनिषा काकडे, संतोष जाधव, अमोल गव्हाणे, ॲड संपतराव इथाटे, नवनाथ दरेकर, सुरेश खामकर, देविदास खेतमाळीस, दिपक साबळे, सागर पवार, नवनाथ खामकर, गोपाळराव डांगे, जनार्दन घोडेकर, किसन वऱ्हाडे, मच्छिंद्र लोखंडे, सह आदी साकलपटू श्रीगोंदा ते चोंडी प्रेरणा वारी सहभागी झाले होते.