राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. मतदारांसमोर समोरच्या पक्षाला चित करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. निवडणुकीतील राजकीय पक्षांची भूमिका आणि त्यांची आजचं महाराष्ट्रातील आजची स्थिती आणि भविष्यातील चित्र, याविषयी मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक असलेल्या डॉ. दीपक पवार यांच्याशी ‘लोकसत्ता डॉट कॉम’नं संवाद साधला. त्यांनी केलेल्या विश्लेषणाचा तिसरा भाग येथे देत आहोत.
डॉ. दीपक पवार यांचं भाष्य ऐकण्यासाठी व्हिडीओ पहा –
आणखी वाचा
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसची अवस्था बिकट असल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने महाराष्ट्रात पाऊल ठेवलं. आजच्या काँग्रेसच्या कारणांचाही पवार यांनी वेध घेतला आहे.