डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख व ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रवींद्र किंबहुने (वय ६७) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. इंग्रजी आणि मराठी साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. प्रा. किंबहुने यांचा ‘किंबहुना’ निबंधसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला. मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारिणीत त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. ‘प्रतिष्ठान’ मुखपत्राचे ते संपादक होते. मराठी व इंग्रजी भाषांचा तौलनिक अभ्यास हा त्यांचा अभ्यासाचा प्रमुख विषय होता.
आणखी वाचा