निळवंडे धरणाचे पाणी गेली ४५ वर्षे येनकेनप्रकारेण नाकारून प्रस्थपित पुढाऱ्यांनी १८२ गावांतील शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केल्याचा आरोप विखे सहकारी कारखान्याचे माजी संचालक मारुतराव गडगे यांनी केलवड येथे केला.
निळवंडे धरणाच्या २५ किलोमीटपर्यंतच्या कालव्यांसाठी तातडीने पाचशे कोटी रुपयांचा निधी मिळावा व निळवंडेच्या पाण्यावर अवैध उपसा सिंचन योजनांना दिलेली परवानगी रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने १० जुलैला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील केलवड िपप्री लोकई आदी ठिकाणी जनजागरण सभांचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी परशराम गमे हे होते. याप्रसंगी अण्णासाहेब वाघे, उत्तमराव घोरपडे, सोमनाथ दरंदले, सरपंच कचरू तारगे, अनिल तारगे आदी उपस्थित होते.
गडगे म्हणाले, आपण प्रस्थापित नेत्यांकडे निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांचे आयुष्यभर समर्थनही केले, पण त्यांनी दुष्काळग्रस्त १८२ गावांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष करून उपकाराची फेड अपकाराने केली. शेती पाण्याअभावी गावेच्या गावे उद्धस्त झाली. तरुणांना काम नाही, शिक्षणाला पैसा नाही. खडी फोडणे अथवा ऊसतोडणी करणे याशिवाय पर्याय राहिला नाही. आता प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करूनच पाणी मिळवावे लागेल. त्यासाठी कोणाचीही पर्वा करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा