विश्वास पवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सातारा : मुंबई-पुण्याशी महामार्गाने जोडल्याने व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने साताऱ्याकडे येणाऱ्या उद्योगांमध्ये वाढच होत आहे. औद्योगिक क्षेत्रात साताऱ्याच्या भरारीचा वेग कायम आहे. पर्यटन, धार्मिक आणि शेतीच्या क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. साताऱ्याची पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी होत असते. पश्चिम भागात अनेक धरणे, नैसर्गिक वनसंपदा मोठय़ा प्रमाणात आहे आणि पर्यटनाची मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध आहे.
सातारा हा पर्यटन, धार्मिक आणि शेतीच्या क्षेत्रातला जिल्हा. मात्र आता साताऱ्याची ही ओळख बदलत आहे. १३ औद्योगिक वसाहती, दोन विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ) यामधून २७ आंतरराष्ट्रीय उद्योग, ६८ मोठे उद्योग, २७ हजार ५०८ लघुउद्योगांच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाचे मोठे वारे साताऱ्यामध्ये मागील पंधरा-वीस वर्षांत चांगलेच फिरत आहे.
हेही वाचा >>>राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण; शशिकांत शिंदे
नव्याने होऊ घातलेल्या विशेष कॉरिडोरमुळे माण, खटाव तालुक्यांत उद्योग उभारणीला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. सातारा शहर, कोरेगाव, वाई, खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कराड तासवडे येथील औद्योगिक क्षेत्र वाढविण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे. त्यामुळे विशेष कॉरिडोर जाणाऱ्या उत्तर कोरेगाव येथील सोळशी, माण व खटाव तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात जागा खरेदीचा प्रयत्न औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू आहे.
साताऱ्यातील कूपर वाईतील गरवारे फलटण येथील कमिन्स या कंपन्यांत अनेक उद्योग आपले विस्तारीकरण करत आहेत. साताऱ्यात औषधापासून वाइनपर्यंत, इलेक्ट्रिकलपासून डिझेल इंजिनपर्यंत उत्पादन प्रकल्प आहेत. त्यातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. दरवर्षी महाबळेश्वर, पाचगणी या गिरिस्थानाकडे राज्य, देश आणि परदेशांतून वीस लाखांवर पर्यटक येत असतात.
हेही वाचा >>>यशवंतरावांच्या विचाराच्या महाराष्ट्राचा बिहार झालाय; राज्यकर्त्यांवर जयंत पाटील यांचे टीकास्त्र
पर्यटन क्षेत्रात एक हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची कामे सध्या गतीने साताऱ्यात सुरू आहेत. महाबळेश्वर, पाचगणीसह अधिकच्या पर्यटनास प्रोत्साहन देणे व पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. साताऱ्यात गडकिल्ल्यांची संख्याही मोठी आहे. किल्ले प्रतापगडच्या पुनर्बाधणी व विकासासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यात वाढ करून आता शंभर कोटी रुपयांची तरतूद करत आहे.
जिल्ह्य़ातील मांढरदेव, सज्जनगड, गोंदवले, म्हसवड, औंध, पाली, वाई येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमुळे धार्मिक पर्यटन राज्यभरातून होत असते. येथील गिरिस्थाने, निसर्गसंपदा, ग्रामीण बाज, उपलब्ध होणारे मनुष्यबळ यामुळे मराठी, हिंदी, भोजपुरी चित्रपटाचे, मालिका, जाहिराती, वेबसीरिज यांचे चित्रीकरण या परिसरात नियमित सुरू असते. त्यासाठी आणखी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात आठ खासगी आणि सात सहकारी असे १५ साखर कारखाने आहेत. मात्र ३६५ दिवसांपैकी हे सर्व साखर कारखाने १६५ दिवस चालत आहेत. त्यामुळे इतर दोनशे दिवसांचा भार साखर कारखान्यांवर पडत आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक स्तरावर मोठा परिणाम होत आहे.
हेही वाचा >>>“सर्व नाभिक आणि मराठा समाजाला…”, ‘त्या’ वक्तव्यावरून छगन भुजबळांचं स्पष्टीकरण
ग्रामीण भागात विकासासाठी प्रयत्न
पुणे-बंगळूरु महामार्गाभोवती झालेला विकास दुष्काळी, दुर्गम आणि डोंगराळ भागात घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे. उद्योगवाढीबरोबर निसर्ग पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाबरोबर कृषी पर्यटनाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे.
पाण्यावरून वाद
साताऱ्यात पाणी अडविले; परंतु सिंचन सुविधा अपूर्ण आहेत. पिण्याचे व शेतीच्या पाण्यावरून वाद होत आहेत. शेती क्षेत्रात माल साठवणूक, हाताळणी, प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ उपलब्धता याची कमी आहे. सिंचन सुविधा अपूर्ण आहेत. त्यामुळे शेती ओलिताखाली आलेली नाही. प्रशासन आणि जनता यामध्ये समन्वयाचा अभाव अजून जाणवत आहे.