हिंगोली मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार राजीव सातव यांची संपत्ती ४ कोटी ३५ लाख, तर शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांची २ कोटी ५९ लाख आहे.
या मतदारसंघात एकूण ४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गुरुवारी या अर्जाची छाननी झाल्यावर शनिवारी (दि. २९) उमेदवारी मागे घेण्याची तारीख असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने मदानातील चित्र स्पष्ट होईल. खरी लढत सातव व वानखेडे यांच्यातच आहे. सातव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी ३५ लाख ३७ हजार ६८२ रुपयांची आहे. यात ५ लाख १२ हजार ५०० रुपये रोख, पत्नी प्रज्ञा यांच्याकडे ७३ हजार ६७१, मुलगा पुष्कराज याच्या नावे ३५ हजार ५०० रुपये, मुलगी युवराज्ञीच्या नावे १० हजार ७०० रुपये असल्याचे नमूद केले आहे. शिवाय त्यांची विविध बँकांमध्ये असलेली ठेवीबंदपत्रे, राष्ट्रीय बचत योजनेची विवरणपत्रे, टाटा सफारी कार आदी ५३ लाख ४६ हजार ५३४ रुपयांची गुंतवणूक आहे. पत्नीच्या नावे बँकेतील ठेवी, ठेवीबंदपत्रे, बचत योजनेची विवरणपत्रे, सोन्याने दागिने आदी ३० लाख १४ हजार ५७८ रुपयांची गुंतवणूक आहे. पुष्कराजच्या नावे १ लाख ५६ हजार ४८२, तर मुलीच्या नावे १ लाख ६५ हजार ६१६ रुपये गुंतवणूक आहे.
शिवसेनेचे उमेदवार वानखेडे यांची स्थावर व जंगम मालमत्ता २ कोटी ५९ लाख ४७ हजार रुपयांची आहे. यात ३२ लाख ४१ हजारांची रोख, पत्नी अनिता, मुलगा भास्कर, मुलगी शिवानी यांच्याकडे कोणत्याच प्रकारे रोख रक्कम नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. बँकेत जमा ठेव, शेअर्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये १४ लाख २ हजार रुपयांची गुंतवणूक आहे. एक मोटार, सोन्याचे दागिने अशी ८० लाख ४७ हजार रुपयांची मालमत्ता आहे. पत्नी अनिता यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याने दागिने, मुलीच्या नावे बँकेत ३ लाख ७७ हजार ९९८, वानखेडे यांच्या नावे २१ लाख २८ हजार रुपयांची शेतजमीन, पत्नीच्या नावे १७ लाख, मुलगा भास्करच्या नावे ४ लाख ७ हजार रुपयांची शेतजमीन आहे.
गायकवाड पावणेदोन कोटींचे, बनसोडे साडेतीस लाखांचे धनी
वार्ताहर, लातूर
लातूर लोकसभा राखीव मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह त्यांच्या पत्नीकडे १ कोटी ८० लाख ५८ हजार ३६६, तर काँग्रेस उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्यासह त्यांच्या पत्नीकडे ३० लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता आहे.
गायकवाड यांच्या पत्नीच्या खात्यावर ७ लाख ९६ हजार ३११ रुपये आहेत. मुंबई येथे दोन फ्लॅट असून त्याची किंमत १ कोटी १८ लाख ४८ हजार रुपये आहे. गायकवाड यांच्या खात्यावर १ लाख ६ हजार १७५ रुपये ७७ पसे आहेत. मिहद्रा जीप, टाटा आरिया, फोर्ड इंडेवर, मर्सिडीज कार व पत्नीच्या नावावर हय़ुंदाई वरना अशी ७ वाहने आहेत. बनसोडे यांच्याकडे एकही वाहन नाही. उस्मानाबाद जिल्हय़ातील महािलग रायवाडी येथे १ हेक्टर १४ आर जमीन बनसोडे यांच्या नावे, लातूर तालुक्यातील गंगापूर येथे २ हेक्टर पत्नीच्या नावे, तर मुलाच्या नावे ०.७३ हेक्टर जमीन आहे. मांजरा व रेणा कारखान्यांचे प्रत्येकी १० हजारांचे शेअर्स आहेत. बसपचे दीपक अरिवद कांबळे यांची पत्नी व आई यांच्यासह २६ लाख ७६ हजार ७९४ रुपयांची मालमत्ता आहे.

Story img Loader