जगातील सर्वात मोठे वाघांचे जंगल म्हणून ओळखल्या जात असलेल्या मध्य भारतातील सातपुडा-मैकल वनक्षेत्र प्रस्तावित कोळसा खाणीमुळे दोन भागात विभाजित होण्याची भीती निर्माण झाली असून वाघांचे कॉरिडॉर्स संपुष्टात येणार असल्याने जनुकीय वैविध्यतेवरही घाला घातला जाईल, अशी परिस्थिती उद्भवणार आहे. नागपूर जिल्हातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे बांधकाम सध्या वेगात सुरू असून मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्य़ातून या महामार्गाचा विस्तार करण्यासाठी सातपुडा-मैकलच्या जंगलातून मार्ग काढावा लागणार आहे. तसेच याच मार्गावर रेल्वेमार्ग टाकण्याचाही प्रस्ताव आहे.
याच वनक्षेत्रात कोळसा खाणीला केंद्राची मंजुरी मिळाली असून त्यासाठी मध्य भारतातील अत्यंत समृद्ध वनक्षेत्राचे दोन भाग करणे अनिवार्य आहे. असे झाल्यास वाघांच्या स्थलांतरणाची नैसर्गिक प्रक्रिया पूर्णपणे अवरुद्ध होणार आहे. मध्य प्रदेशचे वनमंत्री सरताज सिंग यामुळे दुहेरी संकटात सापडले आहेत. एकतर कोळसा खाण किंवा वाघांच्या कॉरिडॉरचे संरक्षण यापैकी एक निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. हा संपूर्ण पट्टा वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे भारतातील अत्यंत समृद्ध वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र दोन भागात विभाजित केल्याखेरीज खाण आणि महामार्गाचे बांधकाम शक्य नाही. अलीकडेच वॉशिंग्टनच्या स्मिथसोनियन कंझव्‍‌र्हेशन बायोलॉजी इन्स्टिटय़ूट (एससीबीआय) या संस्थच्या दोन वन्यजीव अभ्यासकांनी संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा