दापोली : मुंबई – गोवा महामार्गावरील निकृष्ट कामाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर असललेली संरक्षक भिंत पूर्णत: खचत चालली आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून संरक्षक भिंतीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र याठिकाणी केवळ मलमपट्टी केली जात असल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंत झालेल्या चौपदरीकरण कामामुळे वाहनचालकांचा प्रवास सुस्साट झाला असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळण ‘डेंजर स्पॉट’च ठरत आहे. गेल्या ४ महिन्यात भोस्ते घाटातील अवघड वळणावर ३०हून अधिक अपघात घडले आहेत. यात अवजड वाहतुकीच्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवरील चालकांचे नियंत्रण सुटून थेट घाटातील संरक्षक भिंतीवर आदळत असल्याने भिंत खचत आहे. यासाठी साऱ्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत.