कर्जत: भाजपाचे नेते पाशा पटेल यांनी भाजपाचे उमेदवार प्रा. राम शिंदेंच्या प्रचारार्थ सभेत असभ्य व अश्लील भाषा आणि केलेल्या हातवारेच्या विरोधात कर्जत आणि जामखेड मधील महिला आक्रमक होत या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासह जामखेड पोलीस चौकीसमोर कर्जत शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाशा पटेल यांचा पुतळयास जोडे मारत जाळण्यात आला. यावेळी महायुती सरकार, माजी आमदार पाशा पटेल आणि उमेदवार प्रा राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जामखेड येथे भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी संध्याकाळी भाजपाचे नेते माजी आमदार पाशा पटेल यांची सभा झाली. भर सभेत महिला-भगिनी समोर उपस्थित असताना पाशा पटेल यांनी अश्लील भाषा वापरली. तसेच सभेत अनेकदा अश्लील हातवारे केले. या कृत्याचा मतदारसंघातील महिलांनी शुक्रवारी दुपारी तीव्र भाषेत निषेध व्यक्त केला. यावेळी पाशा पटेलांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारत दहन केला.  या प्रसंगी बोलताना राणी कानगुडे म्हणाल्या की, भर सभेत महिला-भगिनी उपस्थित असताना भाजपा उमेदवार राम शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे नेते पाशा पटेल महिलांच्या बाबतीत अश्लील भाषा वापरत होते. अशा लोकांचा कडेलोट करायला हवा. जे अशी भाषा वापरत आहे त्यांना आई-बहीण आहेत की नाही ? असा प्रश्न पडतो. महिलांबद्दल भाजपा नेते कायम वादग्रस्त बोलत आहे.

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
case registered against person who stole jewellery of dead woman in kurla bus accident case
कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

हेही वाचा >>>Raj Thackeray Health Update : “माझी प्रकृती नाजूक…”, राज ठाकरेंनी दोन मिनिटांत आटोपलं भाषण!

तरी त्यांचे नेते त्यांना समज देत नाही याचे दुर्दैव वाटते.  आगामी निवडणुकीत याच लाडक्या महिला-भगिनी या वाचाळवीरांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. यावेळी कर्जत जामखेड मधील महिला भगिनी तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या पुजा सुर्यवंशी, अर्चनाताई राळेभात, राजश्रीताई मोरे,  मीनाक्षी साळुंके, उषा राऊत, मनीषा सोनमाळी, प्रतिभा भैलुमे, हर्षदा काळदाते, पूजा मेहेत्रे, छाया शेलार, ज्योती शेळके, लंका खरात, प्रीती जेवरे, माधुरी पाटील, सुवर्णा सुपेकर, स्वाती कानगुडे, सोनाली वाघमोडे, उषा खुरंगे यांच्यासह मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी कर्जत आणि जामखेडमध्ये पोलीस ठाण्यात जात पोलीस निरीक्षकांना  पाशा पटेल यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदन देवून केली आहे.

Story img Loader