सांगली : सांगली जिल्हा बँकेने थकबाकीदारांकडून वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असली तरी ही मोहीम शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित दिसत असून, बिगरशेती कर्जदारांच्या वसुलीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सोमवारी दिला. बँकेच्या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात आज डिग्रज येथे निदर्शने करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्हा बँकेकडून यंदा विक्रमी नफा मिळवण्यासाठी कर्जवसुली जोरात सुरू केली असल्याचे माध्यमातून सांगण्यात आले. मात्र, ही वसुली थकबाकीदार शेतकऱ्यांकडूनच अधिक सक्तीने सुरू असल्याचे दिसून येते. दुष्काळी, अवकाळी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना जिल्हा बँक सक्तीने वसुली करत आहे. दुसऱ्या बाजूला बिगर शेती कर्ज घेणाऱ्या संस्थांबाबत बँकेचे सबुरीचे धोरण कशासाठी असा सवाल करून श्री. फराटे म्हणाले, थकबाकी वसुलीसाठी सहा थकबाकीदार संस्थांच्या मालमत्ता २८० कोटीला खरेदी केल्या आहेत. यासाठी खरेदीवर २२ ते २५ कोटींचा खर्च बँकेने केला आहे. या संस्थांचा ताबा बँकेकडे आहे. त्यांच्या सुरक्षेवर बँक खर्च करत असताना काही संस्था बिनबोभाट सुरू असल्याचे निदर्शनास येत असताना बँक कानाडोळा का करत आहे. याविरुद्ध आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…चार दिवसांच्या खंडानंतर, सोलापुरात कांदा लिलाव

बँकेच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यासाठी सोमवारी मौजे डिग्रज येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी श्री. फराटे यांच्यासह वसंत हौंजे, वसंत तोडकर, महावीर लांडे, अरविंद पाटील, रावसाहेब पाटील, सुहास गाडवे, अशोक परीट, महावीर चौगुले आदी सहभागी झाले होते.