औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या आजच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाला. विद्यापीठ परिषदेचे सदस्य, उस्मानाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर यांना काळे फासण्यात आले. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निंबाळकर यांना काळे फासले आहे.

मागील काही दिवसांपासून उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी परिषद सदस्य निंबाळकर यांच्याकडून लावून धरली जात आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे महत्त्व सातत्याने कमी केले जात असल्याचा आरोप केला. तसेच यापूर्वी नांदेड येथे स्वतंत्र विद्यापीठ व आता उस्मानाबाद येथेही नवे विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी होत असल्याचा आरोपही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून करण्यात आला.

हेही वाचा : औरंगाबादमधील ‘पाणीबाणी’तील भागीदारीतून स्वत:ला वेगळे करण्याची भाजपाची खेळी

या विरोधातच आक्रमक होत रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निंबाळकर यांना काळे फासले. या प्रकारानंतर सुरक्ष रक्षकांनी आंदोलकाला ताब्यात घेतलं.

Story img Loader