३० वर्षांपूर्वी मी अलिबागला आलो, इथे स्थायिक झालो. इथे येऊन मला जी शांतता मिळते, ती जगात कुठेच मिळत नाही. अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले ते कणकेश्वर फाटा येथे सुशोभिकरण सोहळ्यात बोलत होते.

    अलिबाग मांडवा रस्त्यावरील कणकेश्वर फाटा परीसराचे सुशोभिकरणाचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून ते उपस्थित होते. समिरा उद्योग समुहाकडून या वाहतुक बेटाचे सुशोभिकरण करण्यात आले. या फाट्याला रवी शास्त्री यांचे नाव देण्यात आले. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Image of PM Modi And R Ashwin
PM Modi’s Letter To Ashwin : “तुझ्या कॅरम बॉलने सर्वांनाच बोल्ड केले”, अश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Prithvi Shaw criticized by Mumbai Cricket Association official sports news
पृथ्वीच स्वत:चा सर्वांत मोठा शत्रू! मुंबई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून बोचरी टीका
who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?
Virendra Sehwag Share Post of Rahul Soreng Son of Pulwama Attack Martyr who will play for Haryana in Vijay Marchant Trophy
Virendra Sehwag: वीरेंद्र सेहवागने बदललं शहीद CRPF जवानाच्या मुलाचं आयुष्य, मोफत शिक्षण दिलं अन् आता या संघात झाली निवड
Actor Subodh Bhave expressed his anger that Marathi movie are not getting screens
“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…
beed sarpanch murder case in maharashtra assembly session
बीड: सरपंच हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, आमदार संदीप क्षीरसागर यांचं उद्विग्न भाषण; म्हणाले, “बीडमध्ये चॉकलेट खाल्ल्याप्रमाणे…”,
Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar no minister post, Sudhir Mungantiwar latest news,
‘हा तर मुनगंटीवार यांच्यावर अन्याय’, समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया

 “भारतीय संघात खेळत असतांना मी १९९२ मध्ये अलिबागला आलो. आवास सासवणे परिसरात जागा घेतली, तिथेच स्थायिक झालो. या ३० वर्षांत मला अलिबागने जी शातंता दिली. प्रेम दिले ते जगात कुठेच नाही मिळाले.” असे उद्गार शास्त्री यांनी यावेळी काढले.

    तसेच, “जेव्हा टीम चांगले काम करते तेव्हा लोकांचे प्रेम मिळते. पण जेव्हा टीम हरते तर लोक रागही व्यक्त करतात. यावेळी आलेला ताण-तणाव, निराशा दूर करण्याचे काम अलिबाग करते. त्यामुळे अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. अलिबागमध्ये चांगले खेळाडू आहेत. जे आयपीएल, रणजीमध्ये तसेच देशाच्या संघातही स्थान मिळवू शकतात. पण त्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहीजे, संधी मिळायला पाहीजे.” असे मत देखील रवी शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केले. 

Story img Loader