गेल्या दीड वर्षांपासून बीड जिल्ह्य़ातील वाळूमाफिया, अनधिकृत बांधकामे, टँकरमाफिया यांचे कर्दनकाळ बनलेले जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या तडकाफडकी बदलीमुळे येथील प्रचंड जनक्षोभ उसळला. लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन छेडत केंद्रेकर यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. शिवसेना, भाजप व मनसेनेही या आंदोलनात उडी घेत केंद्रेकर यांच्या बदलीविरोधात आज, शुक्रवारी बीडमध्ये बंदची हाक दिली आहे. केंद्रेकर यांनी अनधिकृत बांधकामे, वाळूमाफिया आणि टँकरमाफिया यांच्यावर कठोर कारवाई केली. या प्रकारामुळे दुखावल्या गेलेल्या वाळूमाफिया व बिल्डर लॉबीने केंद्रेकरांच्या बदलीसाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न चालवले होते. अखेरीस गुरुवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा