सांगली : तडजोड करुन खटला लवकर निकाली काढण्यासाठी २० हजाराची लाच घेऊन दुचाकीवरुन पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाय्यक सरकारी वकिलास लाचलुचपत विभागाने पाठलाग करुन सोमवारी अटक केली.
हेही वाचा >>> कांदा लिलाव पूर्ववत; निर्यात बंदीनंतर दीड हजाराची घसरण
लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु आहे. तडजोड करुन हा खटला लवकर निकाली काढण्यासाठी सरकारी वकिल सोमनाथ माळी यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. चर्चेअंती २० ह. देण्याचे ठरले. लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करुन सोमवारी न्यायालयाबाहेर सापळा लावला. लाचेची रक्कम घेऊन वकिलाने दुचाकीवरुन पोबारा केला. पथकाने न्यायालयापासून १ किलोमीटर अंतरावर विश्रामबागमधील राजमती गर्ल्स कॉलेजजवळ पथकाने संशयिताला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उप अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.