सावंतवाडी : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मालवण राजकोट किल्ल्यावर भेट दिली. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा जनताच कार्यक्रम करणार आहे, पुतळा दुर्घटनेतील दोषी पळून कसे जाऊ शकतात. राजकोट किल्ल्यावर टिकाऊ मोठे स्मारक उभारले पाहिजे.”

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा बांधवांसह मालवणमधील राजकोट किल्ल्यावर भेट देऊन शिवपुतळा दुर्घटनेची पाहणी केली. “मी शिवरायांचा मावळा असून मी राजकोट येथे शिवपुतळा दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आलो आहे, मला या विषयावरून कोणतेही राजकारण करायचे नाही. शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरुन विरोधक व सत्ताधारी यांनी राजकारण करू नये. पुतळा कोसळल्याचे त्यांना दुःखच झाले नाही, दुःख असते तर राडा झाला नसता. छत्रपतींच्या नावाचा वापर केवळ सत्तेसाठी होत असून छत्रपतींच्या नावे राजकारण करणाऱ्यांचा जनताच कार्यक्रम करणार आहे, पुतळा दुर्घटनेतील दोषी पळून कसे जाऊ शकतात, त्यांना शोधून योग्य तो तपास झाला पाहिजे, दोषी व्यक्ती कोणत्याही मंत्र्यांचा मित्र असू दे, तो पंतप्रधानांचा जरी मित्र असला तरी त्याला पकडून जेलमध्ये सडवला पाहिजे.”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Mallikarjun Kharge criticize BJP in nagpur
“बाटना और काटना हे भाजपचे काम” मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
mp shrikant shinde
“आवडत असेल किंवा नसेल महायुतीचा धर्म पाळून सुलभा गणपत गायकवाड यांचा प्रचार करा !”, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे वक्तव्य
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप

आणखी वाचा-MVA Jode Maro Andolan : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं जोडे मारो आंदोलन, ठाकरे-पवारांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

तसेच राजकारण न करता राजकोट येथे शिवरायांचे प्रचंड मोठे असे आणि टिकाऊ स्मारक उभे राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.