|| प्रशांत देशमुख
शेतीवर बंधन, कचरा पेटवण्यास मनाई, परक्या व्यक्तीची चौकशी, दुमजली घरे नाही, फुटलेला बॉम्ब शेतात येऊन पडण्याची टांगती तलवार, रोजगारासाठी आगीशी खेळ अशा छायेत पुलगाव सैन्यदल दारूगोळा भांडाराच्या पंचक्रोशीतील गावे जीवन जगत आहे. पर्याय नाहीच. त्यामुळे भय इथले संपता संपत नाही.
देशातील सर्वात मोठे शस्त्र भांडार असणाऱ्या पुलगाव कॅम्प परिसरात १९८०, ८९, ९२, २००१, २०१६, व आता अशा स्फोटाच्या विविध घटना घडल्या आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ५० वर गावकऱ्यांवर मृत्यू ओढवल्याचे वास्तव आहे. २८ किलोमीटरच्या परिघात भांडाराचे कार्यक्षेत्र असले तरी दीड हजार एकराचा परिसर सुरक्षेस्तव अधिग्रहीत करण्यात आला आहे. याभोवती सोनेगाव, केळापूर, चिकणी, जामणी, आगरगाव, येसगाव, मुरदगाव, नागझरी, नंदपूर, लक्ष्मीनारायणपूर अशी छोटीमोठी गावे वसली आहेत. एकूण दहा हजारावर लोकवस्तीवर भांडाराची गडद छाया आहे. स्फोटकांच्या साठय़ालगत जीवन जगणे म्हणजे आयुष्यभार जीव मुठीत घेऊन वावरण्यासारखे होय, ही गावकऱ्यांची सामूहिक भावना ऐकायला मिळते.
भांडाराच्या संरक्षक तारेच्या कुंपणापासून दोन किलोमीटर असणाऱ्या सोनेगाव (आबाजी) या गावाचे तीन शेतमजूर यावेळी स्फोटात बळी गेले. बॉम्ब निकामी करण्याच्या ठेकेदारी पद्धतीत हेच गाव रोजगारासाठी सर्वात पुढे असते. विमा किंवा सुरक्षेचे कसलेही कवच नसूनही मृत्यूच्या दाढेत स्वखुशीने जाणारे हे गावकरी अजबच रसायन म्हटले पाहिजे. वर्षांतून किमान चार महिने हे काम उपलब्ध असते. परिणामी, गावातील शेतीला कामाचे हातच मिळत नाही. शेती पडीक ठेवावी लागते, अशी खंत उपसरपंच दिलीप भोयर यांनी व्यक्त करतात. पिढय़ान्पिढय़ापासून या कामावर स्वखुशीने लोकं जात आहेत. यापूर्वी तर स्फोटानंतरचे भांगार गोळा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचीच लगबग असायची. बंधने आल्याने ती कमी झाली. मजुरांची गर्दी असतेच. गावातील बेरोजगारी अशी मृत्यूच्या दाढेत शरण जाते. शेतीपूरक उद्योग नाहीत. सिंचन होत नाही. विहिरींसाठी ब्लास्टिंग करू दिली जात नाही. अशाच स्फोटाच्या कंपणामुळे भांडारातील शस्त्रसाठा धोक्यात येऊ शकतो, असे कारण दिले जाते, पण बॉम्ब निकामी करताना गावकऱ्यांच्या शेतात निकामी पायल्या कधीकधी येऊन पडतात. त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही, अशी व्यथा सामाजिक कार्यकर्ते सतीश दाणी यांनी मांडले. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या भोटीत हाच प्रश्न त्यांनी मांडला. शेती व शिक्षणापासून वंचित या गावातील नव्या पिढीत एकही चांगल्या नोकरीला लागला नाही, असे सत्य पुढे येते.
भांडारापासून अध्र्या किलोमीटरवर असणाऱ्या मुरदगावचे ७२ वर्षीय मनोहर येडांगे गुरुजी यांना कधीकाळी सैन्यदलाचा मार खावा लागला होता. कारण त्यांनी शेतात कचरा पेटवला होता. गावात मोठय़ा प्रमाणात जमा होणारा कचरा कुठे टाकायचा, ही नेहमीचीच चिंता असल्याची ते सांगतात.रात्रीचे ओलित करता येत नाही. सायंकाळी पाचनंतर शेतात काम करण्यास मज्जाव असतो. हे अलिखित दंडक पाळावेच लागतात. अन्यथा दंडुके बसतात. असा गावकऱ्यांचा अनुभव आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घरावर एक मजला सुद्धा चढवता येत नाही. भांडार परिसराची टेहळणी होण्याची शंका असते.
जामणी या गावातील एकाचा या स्फोटात बळी गेला. ज्येष्ठ नागरिक शेखबाबा हे सांगतात की, स्फोट होतात तेव्हा घराला हादरे बसतात, वारंवार झोपमोड होते. ५० वर्षांपासून हा तोंड दाबून बुक्क्याचा मार सोसणे सुरू आहे. भांडारासाठी शेती गेली, पण ती पडीकच आहे. करायचे काय हा प्रश्नच आहे. शासनाने हस्तक्षेप केला पहिजे. सामाजिक कार्यकर्ते गिरीश काशीकर यांच्या नेतृत्वात स्फोटानंतरची परिस्थिती शासनास सांगितली होती, पण काहीच दखल घेतली गेली नाही. देशाच्या सीमेवर काही बरेवाईट घडले तर या परिसरातील गस्त वाढते, असा अनुभव शेखबाबा सांगतात.
दहा वर्षांपूर्वी या गावांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. लोकांचे व घरांचे पुनर्वसन होईल, पण शेतीच्या मोबदल्यात शेती देणे शक्य नसल्याचे कारण पुढे आले. हा मुद्दा संपुष्टात आला. या भयग्रस्त जगण्यातून मुक्तता व्हावी, अशी सर्वाचीच भावना आहे. भांडाराभोवती पक्की संरक्षक भिंत तातडीने बांधण्याची गरज व्यक्त होते. बॉम्ब निकामी करण्याची प्रचलित पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणेच सैनिकी प्रशासनाने हे काम हाताळावे, असा गावकऱ्यांचा आग्रह दिसून आला.