मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेला दरोडेखोर ताज्या पाज्या भोसले याला जबरी चोरीच्या गुन्ह्य़ात न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी यांनी या खटल्याचा निकाल आज दिला. सरकार तर्फे सरकारी वकिल नितीन वाघ यांनी काम पाहिले.
या गुन्ह्य़ातील रिमान अचल्या भोसले व उरमशा भोसले हे दोघे अद्याप फरार आहेत. ताज्या भोसले व त्याच्या टोळीविरुद्ध दरोडय़ाचे अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे पोसांनी मोकाची कारवाई केली आहे. तो सध्या औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात आहे. २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री ताज्या व त्याच्या दोन साथीदारांनी सारोळा कासारजवळील (ता. नगर) सुभाषवाडी येथील वसंत कडुस यांच्या घरात घुसले व त्यांनी वसंत कडुस व त्यांच्या पत्नी सुमन या दोघांना मारहाण करुन त्यांच्याकडील ऐवज लुटला होता. ताज्याला कलम ३९४ व कलम ४५७ अन्वये शिक्षा देण्यात आली. गुन्ह्य़ाचा तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. एस. गाडे यांनी केला होता.

Story img Loader