सातारा : पुणे-सातारा महामार्गाच्या अपूर्ण कामाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. या कामावरील ठेकेदार कंपनी ‘रिलायन्स’कडून काम काढून घेऊन दुसऱ्या कंपनीला देण्याचे नियोजन त्यांनी ठरवले आहे. याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई अथवा दिल्ली येथे बैठक घेऊन हे काम काढून दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना

महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रथमच सातारा जिल्ह्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की पुणे – बंगळुरू महामार्गातील पुणे ते सातारा दरम्यानच्या रस्ते विकासाची अनेक कामे अपुरी आहेत. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आपण भेट घेतली. या वेळी त्यांनीही याची दखल घेत या कामावरील ठेकेदार कंपनी ‘रिलायन्स’कडून हेकाम काढून घेऊन दुसऱ्या कंपनीला देण्याचे ठरल्याचे सांगितले. याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई अथवा दिल्ली येथे लवकरच याबाबत बैठक घेऊन हे काम काढून दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात येणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bangalore highway contractor will change say shivendra singh raje bhosale zws